Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रMPSC ची जाहिरात, तब्बल 666 जागांसाठी भरती

MPSC ची जाहिरात, तब्बल 666 जागांसाठी भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (mpsc)विविध परीक्षांच्या जाहिराती जाहीर केल्या जात आहेत. एमपीएससीनं (mpsc)आज महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची 666 पदांची (recruitment)जाहिरात जारी केली आहे. याद्वारे पोलीस उपनिरिक्षक 376, राज्य कर निरीक्षक 190 आणि सहायक कक्ष अधिकारी पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाईल. परीक्षा (exam) 26 फेब्रुवारी 2022 रोजी होणार आहे.

पाकिस्तानचा विजय साजरा करणाऱ्या तिघांना अटक

- Advertisement -

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात 29 ऑक्टोबर दुपारी 2 वाजल्यापासून होणार आहे. अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक 19 नोव्हेंबर आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 544 तर मागासवर्गीय उमेदावारंसाठी 344 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. हे शुल्क ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीनं भरता येईल.

अशा आहेत जागा

सामान्य प्रशासन विभागाकडील सहायक कक्ष अधिकारी पदाच्या 100 जागांवर, तर वित्त विभागाच्या राज्य कर निरीक्षक पदाची 190 आणि गृह विभागाच्या 376 पदांसाठी पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल.

पात्रता

मान्यता दिलेल्या विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. याशिवाय पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसलेले उमदेवार देखील अर्ज दाखल करु शकतात. मात्र, मुख्य परीक्षेपूर्वी त्यांनी उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. तर, पोलीस उपनिरीक्षक पदासाठी पुरुष उमेदवाराची उंची 165 सेमी तर महिला उमेदवारची उंची 157 सेमी असणं आवश्यक आहे. तर पुरुष उमेदवारांना किमान 5 सेमी छाती फुगवता आली पाहिजे.

अशी झाली अनन्याची आर्यनशी ओळख

- Advertisment -

ताज्या बातम्या