Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याअभ्यासाला लागा; एमपीएससी गट क साठी ९०० जागांची भरती

अभ्यासाला लागा; एमपीएससी गट क साठी ९०० जागांची भरती

नाशिक | प्रतिनिधी Nashik

पेपरफुटीमुळे स्पर्धा परीक्षेची (Competitive Examination) तयारी करणारे विद्यार्थी चिंतीत असले तरी परीक्षार्थींचा विश्वास असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) वर्ग क साठी असलेल्या ९०० जागांची जाहिरात आज प्रसिद्ध केली आहे. करोनाच्या महामारीनंतर (Covid Outbreak) प्रथमच एवढी मोठी भरती होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे….

- Advertisement -

राज्य शासनात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भरतीकरीता पात्रता स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या राज्य लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी 900 पदांकरीता जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

एमपीएससीकडून अधिकृत संकेतस्थळावर ‘महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021’ साठी जाहीर करण्यात आलेल्या पदांमध्ये उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, गृह विभाग, वित्त विभाग, सामान्य प्रशासन विभागातील विविध जागांचा सामावेश आहे.

यामध्ये आयोगाने प्रथमच उद्योग निरीक्षक आणि तांत्रिक सहायक या पदांचा समावेश केला आहे. तसेच लिपिक आणि कर सहायक या पदासाठी देखील प्रथमच टायपिंग चाचणी यामध्ये होणार आहे.

या जाहिरातीत प्रामुख्याने उद्योग निरिक्षक 103 पदे, एक्साईज विभाग दुय्यम निरिक्षक 114 पदे, विमा संचलनालय तांत्रिक सहाय्यक 14 पदे, वित्त विभाग कर सहाय्यक 117 पदे, मंत्रालयीन लिपिक टंकलेखक मराठीसाठी 473 पदे, लिपिक टंकलेखक इंग्रजीसाठी 79 पदे यांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या