MPSC कडून ८०० पदांची भरती; ऑक्टोबरमध्ये होणार पूर्वपरीक्षा! वाचा सविस्तर...

अर्जासाठी १५ जुलैपर्यंत मुदत
MPSC कडून ८०० पदांची भरती; ऑक्टोबरमध्ये 
होणार पूर्वपरीक्षा! वाचा सविस्तर...
एमपीएससी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) राज्य शासनाच्या (State Government) विभागांतर्गत विविध संवर्गातील एकूण ८०० पदांची भरती होणार असून त्यासाठी आयोगातर्फे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा (preliminary test) २०२२ ही येत्या ८ ऑक्टोबर रोजी घेतली जाणार आहे....

राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर (37 state in maharashtra) ही परीक्षा होणार असून २५ जून ते १५ जुलै या कालावधित स्पर्धा परीक्षांची तयारी करू इच्छिणाऱ्या तसेच इतर विद्यार्थ्यांही अर्ज करण्याची संधी असेल.

एमपीएससीतर्फे (MPSC) ८०० पदांच्या भरती प्रक्रियेत सामान्य प्रशासन विभागातील सहाय्यक कक्ष अधिकारी, गट- ब या संवर्गातील ४२ पदांची भरती होईल. तर वित्त विभागातंर्गत राज्य कल निरीक्षक ७७ पदे, गृह विभागातील पोलीस उपनिरीक्षक ६०३ पदे, महसूल व वन विभागातंर्गत दुय्यम निबंधक, मुद्रांक निरीक्षक, ७८ पदे असे एकूण ८०० पदांची भरती होणार आहे.

पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरिता मुख्य परीक्षा डिसेंबर २०२२ नंतर होईल. पूर्व परीक्षा १०० गुणांसाठी तर मुख्य परीक्षा ४०० गुणांसाठी होईल. पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी शारिरीक चाचणी १०० गुण व मुलाखत ४० गुण या प्रमाणे होईल. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २५ जूनपासून सुरु होईल. तर १५ जुलै ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

पोलीस उपनिरीक्षक (PSI) होण्याची आणि खाकी वर्दी परिधान करून सामाजिक योगदान देण्याची उर्मी अंगी असणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी यापेक्षा आनंददायी बातमी असू शकत नाही. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली संधी असून ८०० पदांच्या भरतीसाठी विद्यार्थ्यांनी उत्साहाने आणि प्रामाणिकपणे तयारी केल्यास त्यांना यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. विद्यार्थी मित्रांनी या संधीचे सोने नव्हे तर प्लॅटिनम करावे, कारण संधी पुन्हा पुन्हा येत नसतात.

प्रा. राम खैरनार, संचालक, युनिव्हर्सल फाउंडेशन

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com