Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याविकासकामांबाबत खा. गोडसेंची आयुक्तांशी चर्चा

विकासकामांबाबत खा. गोडसेंची आयुक्तांशी चर्चा

दे. कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

शहरातील विविध विकासकामांच्या संदर्भात खा. हेमंत गोडसे ( MP Hemant Godse ) यांनी महानगरपालिका आयुक्तांशी ( NMC Commissioner )चर्चा केली.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले असून रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे.

अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येउन ठेपलेला असल्याने शहरातील खड्डयांमुळे काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तातडीने रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घ्यावे अशा सुचना खा.गोडसे यांनी महानगरपालिका प्रशासनाला केल्या आहेत.

खा.गोडसे यांनी महानगरपालिकेत आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांची भेट घेतली. यावेळी खा.गोडसे यांनी शहरातील विविध समस्या आणि विकास कामांविषयी आयुक्तांशी चर्चा केली. सतंतधार पावसामुळे शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या खड्डयांमुळे अनेक छोटे-मोठे अपघात घडत असल्याने शहरवासियांची मोठी कुचंबना होत आहे.

गणेशोत्सव ( Ganesh Festival )तोंडावर येउन ठेपल्याने त्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी तातडीने रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घ्यावे अशी सुचना वजा आग्रही मागणी यावेळी खा. गोडसे यांनी केली.

मखमलाबाद( Makhmalabad ) शिवारातील प्रस्तावित ग्रीनफिल्ड प्रकल्पासाठी (greenfield project)शेतकरी आपल्या बागायती जमिनी देण्यास तयार नसल्याने सदर प्रकल्प तातडीने रद्द करण्यात यावा. शहरातील हुशार विद्यार्थी आपल्याकडे आय.टी.पार्क नसल्यामुळे इतर दुरच्या शहरात नोकरीसाठी जातात. या विद्यार्थ्यांसाठी शहरात आय. टी. पार्क उभारण्याचा मुद्याकडे खा. गोडसे यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले.

- Advertisment -

ताज्या बातम्या