Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यामंत्रिपदासाठी खा.डॉ. भारती पवारांच्या नावाची चर्चा

मंत्रिपदासाठी खा.डॉ. भारती पवारांच्या नावाची चर्चा

पुनदखोरे । वार्ताहर

नाशिक विभागात आठ पैकी भाजपाचे सहा खासदार असतांनाहीमोदी सरकारमध्ये सध्या उत्तर महाराष्ट्राला मंत्री पद नाही.परिणामी, सत्तेचा अनुशेष आहे. हा अनुशेष भरून काढण्यासाठी आणि नजिकच्या काळात होऊ घातलेली नाशिक महापालिका निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नाशिकला केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात स्थान मिळण्याची चर्चा आहे. दिंडोरीच्या खासदार डॉ.भारती प्रविण पवार, डॉ.प्रीतम मुंढे यांना यात स्थान मिळण्याची चर्चा यामुळे सुरू झाली आहे.

- Advertisement -

पंतप्रधान मोदींनी आपल्या पहिल्या टर्ममध्ये उत्तर महाराष्ट्रातील डॉ.सुभाष भामरे यांना मंत्रीमंडळात स्थान दिले होते.मात्र,दुसर्‍या टर्ममध्ये त्यांना वगळल्याने उत्तर महाराष्ट्राचा अनुशेष राहिला आहे. हा अनुशेष मोदी विस्तारात भरून काढतील, अशा आशा पल्लवित झाल्या आहेत. उत्तर महाराष्ट्रातील आठ खासदारांमध्ये भाजपचे तब्बल सहा खासदार आहेत. यात तीन महिला खासदार आहेत.

उत्तर महाराष्ट्रातील महिला खासदारांच्या त्रिमुर्तीं पैकी एक मोदींच्या विस्तारित मंत्रीमंडळात उत्तर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल, असा एकूण राजकीय होरा आहे. तथापि, कार्यशैली आणि सर्वसमावेशक प्रतिमा यामुळे डॉ. भारती पवार या नावावर पक्षश्रेष्टी शिक्कामोर्तब करतील, असे वाटते.

रवींद्रकुमार जाधव, राजकीय विश्लेषक

नंदुरबारच्या हिना विजयकुमार गावीत आणि रावेरच्या रक्षा निखिल खडसे या सलग दुसर्‍यांदा निवडून आल्या आहेत.डॉ. भारती प्रविण पवार दिंडोरी (नाशिक) या मतदारसंघातून निवडून गेलेल्या तिसर्‍या महिला खासदार आहेत. खा.सुभाष भामरे यांना मंत्री पदाची संधी मिळाली आहे. तेव्हा त्यांचा विचार होणार नाही. हिना गावीत आणि रक्षा खडसे या दोन्ही दुस-यांदा खासदार झाल्याने याही मंत्री पदासाठी प्रबळ दावेदार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या