Friday, April 26, 2024
Homeनगरशिर्डी मंदिरात नियमांची पायमल्ली, खासदार मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार

शिर्डी मंदिरात नियमांची पायमल्ली, खासदार मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार

शिर्डी | शहर प्रतिनिधी | Shirdi

राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार आठ महिण्यांपासून बंद असलेले शिर्डीचे साईमंदीर पाडव्याच्या दिवशी दर्शनासाठी खुले करण्यात आले असून संस्थान प्रशासनाने भाविकांसाठी तयार केलेल्या सोशल डिस्टंसींगच्या नियमावलीचे खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी के.एच. बगाटे आणी त्यांच्या पत्नी यांनीच नियम मोडल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी केला आहे. दरम्यान याप्रकरणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्व प्रकरणाची माहिती देणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

- Advertisement -

दरम्यान राज्य सरकारने दि.16 रोजी राज्यातील सर्व मंदिरे उघडण्याचा आदेश दिला होता. त्या अनुषंगाने देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डी येथील साईबाबांचे मंदिर सोमवारी साईमंदीर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्याबाबत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या उपस्थितीत साईसंस्थानच्या सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली होती.

या बैठकीत भाविकांसाठी तयार केलेली नियमावलीचे स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बगाटे यांनी सोमवारी काकड आरतीला सोशल डिस्टंसींगचे उल्लंघन केल्याचा आरोप खासदार सदाशिव लोखंडे यांनी केला असून त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मी काकड आरतीला स्वतः उपस्थित होतो, त्यावेळी शिर्डी ग्रामस्थ देखील होते. रविवारी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार दर्शनबारीत, तसेच गाभाऱ्यात सोशल डिस्टंसींगचे पालन झाले पाहिजे यासाठी मार्किंग करण्यात आली होती, मात्र या मार्किंगमध्ये बगाटे आणी त्यांच्या पत्नी उभे न राहाता त्यांनी नियमावलीचे उल्लंघन करत सोशल डिस्टंसींगचा फज्जा उडवला आहे. दरम्यान सर्व साधारण भाविकास एक नियम आणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना एक असे होवू शकत नाही. याबाबत अनेक वर्षापासून मंदिरात काम करणाऱ्या लोकांचा सल्ला घ्यायला हवा होता मात्र तसे न करता स्वताच निर्णय घेत असल्याने हि भुमिका योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. आँनलाईन पासेसचा देखील फज्जा उडाला असल्याचे खा.लोखंडे यांनी म्हटले.

- Advertisment -

ताज्या बातम्या