नाशकात आले अन् मिस्सळ खाल्ली नाही तर काय खाल्लं?

खासदार सुप्रिया सुळेंना आवडते नाशिकची 'मिसळ थाळी'
नाशकात आले अन् मिस्सळ खाल्ली नाही तर काय खाल्लं?

नाशिक l प्रतिनिधी Nashik

प्रत्येक शहराची आपली वेगळी अशी ओळख आहे. ही ओळख टिकून राहावी यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. नाशिकचेच बघा ना, इथे आलो आणि मिसळ (Misal) खाल्ली नाही तर काय खाल्लं असे होते. इथल्या विशिष्ट प्रकारच्या मिसळीची चर्चा सर्वदूर आहे. असे राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी म्हणताच सभागृहातील मिसळप्रेमींनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली....

खा. सुळे नाशिक दौऱ्यावर (Nashik Tour) होत्या. यावेळी नाशिकमधील सीए (सनदी लेखापाल) यांच्यासोबत एका बैठकीला त्या संबोधित करत होत्या. त्या म्हणाल्या, आम्ही वार बघत नाही तारीख बघतो. राजकारणात सुट्टीच्या दिवशी अधिक कामे असतात.

एखादी गोष्ट चांगली दिसण्यासाठी किती वेगवेगळ्या कल्पना केल्या जातात हे जास्त महत्वाचे आहे. आपली वस्तू आपण किती चांगल्या प्रकारे सादर करू शकतो याचे उत्तम उदाहरण मिसळ थाळीचे घेता येईल. भली मोठी थाळी घेऊन ती खाद्यप्रेमीच्या टेबलवर जेव्हा सरकते तेव्हा तिच्याकडे बघूनच मन तृप्त होत असते.

या गोष्टी खाद्यपदार्थ केवळ एक उदाहरण आहे. इतरांपेक्षा वेगळं काही करून मार्केट काबीज करण्याला हुशारी म्हणतात. यासाठी आपल्या ग्राहकांचा किंवा मार्केटचा अभ्यास असणे महत्त्वाचे असते.

हे मार्केटच काय हवे आहे हे ठरवते. सगळ्यात चांगली मिसळ नाशकात मिळते. नाशिकच्या मिसळचे नाव सर्वदूर आहे. बैठकीला पोहोचण्याच्या आधीच मिसळीचा घमघमाट खासदार सूळेंना आलेला होता. त्यामुळे त्यांनी आवर्जून नाशिकच्या मिसळचे तोंड भरून कौंतुक केले.

इथल्या मिसळचे प्रेझेन्टेशन खूप चांगले असून भारी असे पॅकेज आहे. यावेळी त्यांनी पुण्यातील एक दोन ठिकाणांचे उदाहरणे देखील दिली. आपण काय देतो यापेक्षा आपण कसे ते आपल्या ग्राहकांना देतो हे जास्त महत्वाचे आहे.

खासदार, आमदार चहावरून सभागृहात हशा

खासदार आमदार चहाने हाय वे वर धुमाकूळ घातला आहे. इतकी रंजक नावे याआधी मी कधी ऐकली नव्हती. असे म्हणतात सभागृहात हशा पिकला. त्या म्हणाल्या, अलीकडे एक अमृततुल्याची चर्चा सर्वदूर झाल्यानंतर त्यालाच जोडून आता खासदार आमदार, गुळाचा, साखरेचा चहा समोर आला आहे. या सर्व ठिकाणी मात्र, विशिष्ट प्रकारचे चहाचे भांडे, चव आदी गोष्टींची काळजी घेतली जाते.

Related Stories

No stories found.