Video : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाशकात आगमन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा खा. शरद पवार (Sharad Pawar) यांचे काही वेळापूर्वीच नाशकात आगमन झाले आहे. शरद पवार आजपासून दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर (Tour) आले आहेत...

या दौऱ्यात पवार दोन ते तीन कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक लोकसभा जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड (Kondaji Awhad) व शहराध्यक्ष रंजन ठाकरे (Ranjan Thackeray) यांनी दिली.

आगामी निवडणुकांच्या (Elections) पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार नाशिक दौऱ्यावर आले आहेत. निवडणुकांबाबत ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याची असल्याची माहिती मिळत आहे.

आज सकाळी साडेबाराच्या सुमारास इगतपुरी तालुक्यातील सोनोशी येथे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे स्मारकाचे भूमिपूजन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. सोनोशी येथील कार्यक्रमानंतर पवार यांच्या हस्ते सायंकाळी सहा वाजता निफाड तालुक्यातील रानवड सहकारी साखर कारखान्याच्या गळित हंगामाचा प्रारंभ होणार आहे.

आ. दिलीप बनकर यांच्या संस्थेने रानवड कारखाना चालविण्यास घेतला आहे. उद्या नाशिक शहरात होणाऱ्या शिक्षण संस्थाचालक महामंडळाच्या सुवर्णमहोत्सवी अधिवेशनास सकाळी दहा ते बारा या वेळेत खा. शरद पवार उपस्थित राहणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com