राऊतांचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा; म्हणाले, 'त्या' प्रत्येकाचे...

राऊतांचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा; म्हणाले, 'त्या' प्रत्येकाचे...

नागपूर | Nagpur

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून (Maharashtra-Karnataka border issue) विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये (Winter session) जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. आज राज्य सरकार विधिमंडळात सीमाप्रश्नावर ठराव मांडणार असल्याने त्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

यावेळी राऊत म्हणाले की, कधीकाळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे विरोधीपक्षनेते होते. विधानसभेचा वापर त्यांनी भष्ट्राचाराविरोधात आवाज उठवण्यात केला होता. त्यांनी सरकारमधील मंत्र्यांची अनेक प्रकरणं बाहेर काढली आणि राजीनामा घेण्यासाठी दटून राहिले. आज सत्तेत बसल्यावर त्यांना भ्रष्टाचाराची (Corruption) प्रकरणं जी विरोधी पक्षाने काढली आहे ही त्यांना बॉम्ब न वाटता लवंगी फटाके वाटत आहे का? एवढे बदलले आमचे देवेंद्रजी? असा खोचक सवाल संजय राऊतांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले की, आम्ही नागपुरात बॉम्ब फोडू असे म्हणालो होतो. काल उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, वाती तयार आहेत. अजून अधिवेशन संपलेले नाही. मुख्य म्हणजे आमच्यासाठी सीमा प्रश्नाचा ठराव अत्यंत महत्वाचा आहे. तसेच फक्त एक-दोन नव्हे मंत्री नाही तर संपूर्ण सरकारच अडचणीत आहे. जे शिवसेनेतून फुटून गेलेले आहेत. आणि ज्यांच्या मदतीने देवेंद्र फडणवीस सरकार चालवत आहेत. त्या प्रत्येकाचे तुम्ही लवंगी फटाके म्हणा.. बॉम्ब म्हणा... लवकरच फुटतील, असा इशाराही राऊतांनी दिला.

तसेच कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Minister Abdul Sattar) यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून राजकारण सुरू असताना देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या भूमिकेवर बोलतांना राऊत म्हणाले की, ही सारवासारव आहे. भ्रष्टाचाराला पाठिशी घालण्याचे काम फडणवीस मनापासून करत असतील, असे मला वाटत नाही. त्यांची काहीतरी मजबुरी आहे. त्यांच्यावर हे लादलेलं सरकार आहे. आम्हाला फडणवीसांविषयी पूर्ण सहानुभूती आहे, असेही राऊत म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com