संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल, म्हणाले...

संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल, म्हणाले...

मुंबई | Mumbai

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत (Shivsena) दोन गट पडले आहेत. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये सातत्याने एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात (Winter session) विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह शिंदे गटातील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut)यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे...

यावेळी ते म्हणाले की, शिंदे गटाच्या (Shinde Group) नेत्यांमध्ये जराही स्वाभिमान राहिलेला नाही. त्यांना शिवसेनेबरोबर भाजपची (BJP) युती करायची होती. पंरतु, आता ते आपला पक्ष भाजपत विलीन करत आहेत. त्यामुळे त्यांना एकही जागा नको. शिवसेना मात्र यापुढेही संघर्ष करत राहील, असे संजय राऊतांनी संगितले.

तसेच शिंदे गट एक टोळी असून टोळीला अस्तित्व नसते. टोळी गँगवॉरमध्ये किंवा पोलीस एनकाऊंटरमध्ये मारली जाते. हे स्वत:ला टोळी मानत असतील तर त्यांचे म्हणणे बरोबर आहे. त्यांना एकही जागा नको. जितके दिवस आहेत, तितके दिवस खंडण्या गोळा करायच्या आणि नंतर परदेशात पळ काढायचा असे त्यांचे नियोजन असेल, असा खोचक टोलाही संजय राऊतांनी लगावला.

पुढे ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj)अपमान हा सर्वात मोठा अपमान आहे. महाराष्ट्र आणि देशाचा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून सुरु होतो आणि तिथेच संपतो. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari)यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेले विधान भाजपला मान्य आहे का हे भाजपने स्पष्ट करावे. तसेच इतर राज्यांना भूगोल आहे, महाराष्ट्राला इतिहास आहे. राज्यपाल कोश्यारी यांना जर तो इतिहास मान्य नसेल तर विरोधी पक्षाने राज्यपालांना हटवण्याची मागणी केली आहे. त्यावर आधी भाजपने उत्तर द्यावे, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com