‘तो’ व्हिडीओ ट्वीट करत संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं; म्हणाले...

‘तो’ व्हिडीओ ट्वीट करत संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं; म्हणाले...

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे काल (मंगळवार) युवसेनाप्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात (Worli Constituency) होते. यावेळी त्यांचा कोळी समाजाच्या (Koli community) वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी भाषणांमधून ठाकरे गटावर निशाणा साधला.

आदित्य ठाकरेंच्या वरळी विधानसभा मतदारसंघात शिंदे गट आणि भाजप (BJP) जोरदार शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे या कार्यक्रमाबद्दल बोलले जात होते. त्यानुसार भाषणांमधून टीका-टिप्पणीही झाली. मात्र, या कार्यक्रमाचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून असाच एक व्हिडीओ शेअर करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचलं आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

‘तो’ व्हिडीओ ट्वीट करत संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं; म्हणाले...
RBI चे पतधोरण जाहीर; महागड्या कर्जातून सर्वसामान्यांना दिलासा नाहीच

यावेळी राऊत यांनी व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असतांना लोक घरी निघालेत. वरळी कोळी बांधवांनी धोक्याचा बावटा दाखवला..कशाला उगाच स्वतःची अब्रू काढून घेताय. ३२ वर्षांचा तरुण नेता भारी पडतोय बरोबर ना? असा खोचक सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

तसेच राऊत पुढे म्हणाले की, प्रत्येक नेत्याला तो ज्या पदावर आहे त्या पदाच्या भूमिकेत शिरावं लागतं. मी मुख्यमंत्री, राज्यपाल आहे. पंतप्रधान आहे, या भूमिकेत न शिरता जे काम करत आहेत. त्यांचा मग पचका होतो. तो काल वरळीत झाला. राज्यापुढे अनेक प्रश्न आहेत, समस्या आहेत. तरीही हिन दर्जाच्या राजकारणात मुख्यमंत्री पडत असतील आणि त्यासाठी सत्ता वापरणार असतील तर जनता सर्व पाहत असते. मग जनता अशा मुख्यमंत्र्यांकडे पाठ फिरवते. हे काल वरळीत पाहिले असेल, असेही त्यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com