Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यासंजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांना खुलं आव्हान; म्हणाले, हिंमत असेल तर...

संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांना खुलं आव्हान; म्हणाले, हिंमत असेल तर…

मुंबई | Mumbai

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे शिवसेनेत (Shivsena) ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे राज्यात दोन्ही गटांचे नेते कोणत्या न कोणत्या मुद्द्यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतांना दिसत आहेत. त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत त्यांना थेट आव्हान दिले आहे…

- Advertisement -

केंद्र सरकारचं मोठ ‘गिफ्ट’! LPG सिलेंडरवर सबसिडी केली जाहीर

यावेळी राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे जर उठाव केल्याचा क्रांती घडवल्याचा दावा करत असतील तर त्यांनी हिंमत असेल तर अगोदर राजीनामा द्यावा. त्यानंतर स्वतःचा पक्ष स्थापन करून त्यांनी पाच आमदार तरी निवडून आणून दाखवावेत, असे आव्हान यावेळी राऊतांनी शिंदे गटाला (Shinde Group) दिले. तसेच कालपासून देशात आणि राज्यात ज्या घटना घडत आहेत त्या पाहता देशात लोकशाहीच राहिलेली नाही, असेही राऊतांनी म्हटले.

ठाकरे गटाच्या खासदाराला जीवे मारण्याची धमकी

पुढे ते म्हणाले की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उद्या संध्याकाळी ५ वाजता मालेगावला (Malegaon) पोहचतील. शिवसेनेचे प्रमुख नेते त्यांच्यासोबत असतील. उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी लाखो लोक उत्सुक आहेत. मालेगावमधून उद्या जो संदेश जाईल तो संपूर्ण राज्यात जाणार आहे. मालेगावमध्ये शिवसेनेचे आमदार निवडून आले होते, मात्र ते पळून गेले. आता मालेगावचे पुढचे आमदार हे अद्वय हिरे असतील, असे संजय राऊत यांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या