राऊतांचा डाव्होस दौऱ्यावरून शिंदे सरकारवर निशाणा; म्हणाले...

राऊतांचा डाव्होस दौऱ्यावरून शिंदे सरकारवर निशाणा; म्हणाले...

मुंबई | Mumbai

स्वित्झर्लंड (Switzerland) येथील डाव्होसमध्ये ( Davos) सुरू असलेल्या गुंतवणूकदारांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात (Maharashtra) सुमारे ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. त्यावरून ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊतांनी (MP Sanjay Raut) शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी शिवसेनेचे नाव आणि पक्ष चिन्हाबाबत होणाऱ्या सुनावणीसंदर्भातही प्रतिक्रिया दिली...

यावेळी ते म्हणाले की, अडीच लाख कोटींची गुंतवणूक राज्यात होणार होती. ती आमच्या डोळ्यासमोर निघून गेली. त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी (CM )परत आणण्यासाठी प्रयत्न केले नाही. उपमुख्यमंत्र्यांनीही परत आणण्यासाठी प्रयत्न केले नाही. आता मात्र, दावोसला गुंतवणुकदारांची (investors) जागतिक जत्रा भरते. त्या जत्रेतून सव्वा लाख कोटी आणणार आहेत. ते आल्यावर आम्ही बोलू. त्या उद्योगांची पायाभरणी होईल. लोकांना त्यातून रोजगार मिळेल. तेव्हा आम्ही त्यावर मत व्यक्त करू. त्यांना यश आले असेल, तर त्यांचे स्वागत करू, असे राऊत म्हणाले.

पुढे त्यांनी निवडणूक आयोगासमोर (Election Commission) होणाऱ्या सुनावणीबाबत बोलतांना सांगितले की, शिवसेना (Shivsena) कोणाची हा तांत्रिक मुद्दा निवडणूक आयोगासमोर उपस्थित होऊ शकतो. मात्र, शिवसेना कोणाची हा प्रश्न महाराष्ट्रात उपस्थित होऊ शकत नाही. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनाच खरी आहे. शिवसेना एकच आहे, असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com