Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याराऊतांचा राज ठाकरेंना टोला; म्हणाले, १८ वर्षांनंतरही...

राऊतांचा राज ठाकरेंना टोला; म्हणाले, १८ वर्षांनंतरही…

मुंबई | Mumbai

काल गुढीपाडव्यानिमित्त (Gudhipadva) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवाजी पार्कवर जाहीर सभा झाली. यावेळी राज ठाकरेंनी (Raj Thackeray) जाहीर सभेतून महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष तसेच उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंमुळेच एकनाथ शिंदेंसारखे अनेकजण शिवसेनेतून बाहेर पडले, अशी टीका त्यांनी यावेळी केली. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे…

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे विधानभवनात एकत्र

यावेळी राऊत म्हणाले की, “राज ठाकरेंचे भाषण मी बघितले नाही. सकाळी मी वाचलं. त्यांच्या पक्षाला आता १८ वर्ष झाली आहेत. त्यांचा पक्ष वयात आला आहे. त्यांच्या पक्षाचं काय सुरू आहे, मला माहिती नाही. आम्ही फक्त आमच्या पक्षाचा विचार करतो. पण १८ वर्षांनंतरही ते उद्धव ठाकरेंवरच बोलतात. उद्धव ठाकरे मोठे नेते आहेत. एकनाथ शिंदे, नारायण राणे, भाजपा, राज ठाकरे केवळ उद्धव ठाकरेंवर (Udhav Thackeray) बोलत असतात. याचाच अर्थ उद्धव ठाकरेंबद्दल सर्वांच्या मनात भीती आहे”, असे त्यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, “आज प्रत्येकजण भाजपने लिहून दिलेली भाषणे वाचत आहे. तसेच प्रत्येक पक्षाची एक भूमिका असते, ती भूमिका घेऊन ते जात असतात. आम्ही देखील आमची भूमिका घेऊन पुढे जात असून बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेत आहोत. तसेच राज्यातील जनता उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असून कोणाला धनुष्यबाण मिळालं, कोणाला नाव मिळालं, म्हणून त्यांचा पक्ष होत नाही. आम्ही आमचं काम करत आहोत असे, राऊतांनी सांगितले.

मोठी बातमी! राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा; काय आहे प्रकरण?

तसेच राज्यात आज महागाई, बेरोजगारीच्या (Inflation and Unemployment) अनेक समस्या असून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे अशा मुद्द्यांवर विरोधकांनी बोलावे, असे आवाहन देखील राऊतांनी यावेळी केले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या