... तर २०२४ ला तुरुंगात जाण्याची तयारी ठेवा - संजय राऊत

... तर २०२४ ला तुरुंगात जाण्याची तयारी ठेवा - संजय राऊत

मुंबई | Mumbai

ठाकरे आणि शिंदे गटात (Thackeray and Shinde Group) दररोज विविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही. काल शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकरांनी (Minister Deepak Kesarkar) खासदार संजय राऊत हे पुन्हा एकदा जेलमध्ये जातील असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आज संजय राऊतांनी (Sanjay Raut) आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले आहे...

यावेळी राऊत म्हणाले की, आमच्या पक्षासाठी, महाराष्ट्रासाठी (Maharashtra) आम्ही पुन्हा तुरुंगात जाऊ. आम्ही तुमच्यासारखे पळपुटे, लफंगे नाही आहोत. तुम्ही म्हणजे न्यायालय नाही. कायदा नाही. दीपक केसरकर खरंच असं बोलले असतील, तर २०२४ साली त्यांनीही तुरुंगात (Prison) जायची तयारी ठेवावी, सगळे तयार आहे, असे राऊतांनी सांगितले.

तसेच वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) आणि शिवसेनेच्या युतीबाबत बोलतांना ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि शिवसेना यांच्यात चर्चा सुरू आहे. प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेतील चर्चेची माहिती मविआच्या नेत्यांना अधिकृतपणे दिली आहे. कुणाचा विरोध आहे, कुणाचा नाही हे भविष्यात कळेल. पण महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकरांना (Babasaheb Ambedkar) मानणारी शक्ती प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एकवटली आहे. प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे संघटन आपल्यासोबत आले, तर महाराष्ट्रात आणि देशात परिवर्तनाची नांदी सुरू होईल, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com