राहुल गांधींचा भाजपवर मोठा आरोप; म्हणाले, माझ्या...

राहुल गांधींचा भाजपवर मोठा आरोप; म्हणाले, माझ्या...

नवी दिल्ली | New Delhi

कॉंग्रेस खासदार राहुल गांधी (MP Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेला ( Bharat Jodo Yatra) सध्या देशभरात मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. काश्मीरपासून (Kashmir) सुरू झालेली यात्रा सध्या देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये (Delhi) आहे. यावेळी राहुल गांधींनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य करत भाजपवर टीका केली...

यावेळी ते म्हणाले की, भाजपने माझ्यावर आक्रमकपणे टीका करावी, अशी माझी इच्छा आहे. त्यांच्या या टीकेमुळे काँग्रेस (Congress) पक्षाला आपली विचारधारा समजण्यास मदत होईल. माझ्यावर जेवढी टीका होईल, तेवढा काँग्रेस पक्षाला अधिक फायदा होईल. त्यामुळे एकप्रकारे मी भाजपला माझा गुरू मानत असून त्यांच्यामुळेच मला आयुष्यात काय करू नये, याची शिकवण मिळते, असे राहुल गांधींनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की,माझी बदनामी (Defamation) करण्यासाठी भाजपने हजारो कोटी रुपये खर्च केले. याआधी मी यावर ९९ टक्के विश्वास ठेवत होतो. मात्र आता मला १०० टक्के खात्री आहे की, भाजपने (BJP) माझ्या बदनामीसाठी हजारो कोटी खर्च केले. मात्र सत्य लपविण्यासाठी कितीही खर्च करा किंवा कितीही कॅम्पियन चालवा, काहीही होणार नाही, असेही यावेळी राहुल गांधींनी स्पष्ट केले.

तसेच राहुल गांधी पुढे म्हणाले की, भारत जोडो यात्रा जेव्हा आम्ही सुरू केली, तेव्हा ती साधारण यात्रा होती. मात्र, त्यानंतर हळूहळू या यात्रेत लोक जुळत गेली. आज ही यात्रा सर्वसामान्यांचा आवाज बनली आहे. देशातील विरोधीपक्ष देखील आमच्या बरोबर आहेत. मला कल्पना आहे की राजकीय मतभेदांमुळे काही लोकं (People) या यात्रेत सहभागी होत नाहीत. मात्र, आमची विचारधारा एक आहे, असेही त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com