खासदार नवनीत राणांकडून उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख; म्हणाल्या, तू ठाकरे है...

खासदार नवनीत राणांकडून उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख; म्हणाल्या, तू ठाकरे है...

मुंबई | Mumbai

खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंमध्ये (ShivSena chief Uddhav Thackeray) हनुमान चालीसावरुन (Hanuman Chalisa) सुरु झालेला वाद अजूनही चालूच आहे.

उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा वाचण्याचा प्रयत्न केल्यानंतर झालेल्या कारवाईमुळे राणा दाम्पत्य चांगलेच आक्रमक झाले आहे. यानंतर राणा दाम्पत्य उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. त्यातच आता नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर एकेरी भाषा वापरत निशाणा साधला आहे.

यावेळी राणा म्हणाल्या की, तू ठाकरे है तो मैं भी राणा हूं. मी मुंबईची (Mumbai) मुलगी आणि विदर्भाची सून आहे. तुम्ही शिवसेनेचे असाल तर मी पण विदर्भाची सून आहे, आमना सामना तर लवकरच होईलच. त्यात कळेल की कोण किती ताकदवान आहे, अशा शब्दात नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

पुढे त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री पदावर असताना उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. ते फक्त फेसबुकच्या माध्यमातून जनतेपर्यंत जात होते. ही महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी बाब होती, अशी टीकाही त्यांनी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com