नवनीत राणांचं दिल्लीत हनुमान चालीसा पठण; पाहा Video

नवनीत राणांचं दिल्लीत हनुमान चालीसा पठण; पाहा Video

दिल्ली । Delhi

खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मुंबईत (Mumbai) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निवासस्थान मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला होता.

परंतु त्यांनी नंतर माघार घेतली. मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यामुळे तसेच सामाजित तेढ निर्माण केल्यामुळे खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांना १४ दिवस कोठडीत राहावे लागले होते.

त्यानंतर आज राणा दाम्पत्यानं नवी दिल्लीतील प्राचीन मंदिरात हनुमान चालीसा पठण आणि महाआरती केली. राणा दाम्पत्यानं नवी दिल्लीतील त्यांच्या राहत्या घरापासून ते कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरापर्यंत पदयात्रा केली. त्यानंतर हनुमान मंदिरात आपल्या समर्थकांसह महाआरती केली. यावेळी नवनीत राणा यांनी हनुमान चालीसा पठण देखील केलं.

दरम्यान हनुमान चाळीसा पठणानंतर मी घाबरणार नाही, थकणार नाही. महिलांना घाबरवून जेलमध्ये डांबणं हे मान्य नाही तसेच इतकी कमजोर देशातील स्त्री मुळीच नाही, महाराष्ट्रातील सर्वात मोठं संकट म्हणजे उद्धव ठाकरे असून महाराष्ट्र संकटमुक्त होण्यासाठीच हनुमान चालिसा पठण करण्यात येत आहे. असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

Related Stories

No stories found.