Tuesday, April 23, 2024
HomeनाशिकVideo : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री त्र्यंबकराजाच्या चरणी लिन; शेतकरी कायद्यावर केले भाष्य...

Video : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री त्र्यंबकराजाच्या चरणी लिन; शेतकरी कायद्यावर केले भाष्य…

त्र्यंबकेश्वर | वार्ताहर

पंतप्रधान मोदी हेच शेतकऱ्यांचे भले करणार आहेत. शेतकरी कायदा नीट समजून घेतला पाहिजे. यामध्ये शेतकऱ्यांचा फायदाच आहे. असे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी काढले.

- Advertisement -

देशात आतापर्यंत नरेंद्र मोदींपेक्षा शेतकरी हीत बघणारा एकही पंतप्रधान झाला नाही. नवीन कृषी विधेयकामुळे शेतकर्‍यांचा फायदा असून कोणतेही नुकसान नाही, असे प्रतिपादन मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले.

नववर्षानिमित्त शिवराजसिंह चौहान यांनी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. गेलं वर्ष भयावह होत. आपला देश , आपला प्रदेश प्रभावित झाला होता. आज पासून कोरोनाचा सुरू असलेला ड्राय रन यशस्वी होवो ही प्रार्थना केली.

जीएसटी वसुली व्यवस्थित होऊन अर्थ व्यवस्था व्हावी ही प्रार्थना केली.मध्यप्रदेश मध्ये कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात , मृत्य दर देखील नियंत्रणात आहे.मध्यप्रदेश मध्ये कोरोना हाताबाहेर गेला नाही ही देवाची कृपा आहे.

सज्जनो के लिये हम फुल से ज्यादा कोमल ; लेकीन गुंडोको नही छोडेंगे अस म्हणत लव जिहादच्या कायद्याचं कठोर पालन केले जाइल. दोषितांवर कठोर शासन केलं जाणार असे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या