
मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे राज्यातील विविध ठिकाणी भावी मुख्यमंत्री म्हणून अशा आशयाचे पोस्टर्स राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लावले आहेत.अशातच आता राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत एक वक्तव्य केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत...
खासदार कोल्हे यांनी जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याने मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. तसेच कोल्हे यांनी जयंत पाटलांचे सुपुत्र प्रतीक पाटील (Pratik Patil) यांना लोकसभेत पाठवा, असे आवाहनही यावेळी केले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. अजित पवार जर भाजपसोबत गेले तर त्यांना मुख्यमंत्रिपद देखील मिळू शकते अशीही चर्चा सुरू आहे. त्यातच आता अमोल कोल्हेंच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांनी जोर धरला आहे.