Wednesday, May 8, 2024
Homeमुख्य बातम्याबहुप्रतीक्षित सिनेमागृह, नाट्यगृह होणार सुरु; अशी आहे नियमावली

बहुप्रतीक्षित सिनेमागृह, नाट्यगृह होणार सुरु; अशी आहे नियमावली

मुंबई | Mumbai

बहुप्रतीक्षित सिनेमागृह आणि नाट्यगृह सुरू होणार आहेत. सिनेप्रेमी आणि नाटक प्रेमींसाठी अत्यंत महत्वाची बातमी. राज्य सरकारने (Maharashtra Government) दिली आहे. येत्या २२ ऑक्टोबरपासून राज्यातील सिनेमागृह (Theater) आणि नाट्यगृहे खुली होणार आहेत….

- Advertisement -

पन्नास टक्के उपस्थितीत राज्यातील नाट्यगृह आणि सिनेमागृह सुरू होणार आहेत. एक जागा रिकामी ठेवून बसण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आली आहे. नाट्यगृह आणि सिनेमागृह सुरू करण्यापूर्वी सॅनिटायझेशन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मोकळ्या जागेत सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासही परवानगी देण्यात आली आहे.

प्रशांत दामले म्हणतात….

खूप काळाच्या प्रतिक्षेनंतर आता मराठी रंगभूमीवरील पडदा वर जाणार आहे, परत रंगमंच प्रकाशाने उजळून जाणार आहे आणि रसिकांचे रंजन करायला सज्ज होणार आहेत – तुमचे लाडके नाट्यकर्मी!

’एका लग्नाची पुढची गोष्ट’ आणि ’तू म्हणशील तसं’ ह्या दोन सदाबहार नाटकांचे कलाकार उद्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करत रंगभूमीवरील एका नव्या पर्वाचा श्रीगणेशा करणार आहेत! ह्या नाटकांना, रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभत राहो हीच त्या गणेशाच्या चरणी प्रार्थना!

- Advertisment -

ताज्या बातम्या