WhatsApp धक्का : signal ची लोकप्रियता वाढली

jalgaon-digital
2 Min Read

नवी दिल्ली

WhatsApp ने आणलेल्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीवरुन प्रचंड गदारोळ सुरू आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या या नवीन प्रायव्हसी पॉलिसीचा विरोध सुरू आहे. यामुळे अनेक युजर्स सिग्नल आणि टेलिग्राम सारख्या अ‍ॅपकडे वळले आहेत. सिग्नल अ‍ॅपच्या लोकप्रियतेमध्ये तर प्रचंड वाढ झाली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपला मागे टाकून भारतातील अव्वल फ्री अ‍ॅप बनल्याची माहिती सिग्नल अ‍ॅपने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन दिली आहे. अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरमध्ये सिग्नल अ‍ॅपने व्हॉट्सअ‍ॅपवरही मात केली आहे. अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरमध्ये सर्वाधिक डाउनलोड होणाऱ्या फ्री अ‍ॅप्सच्या यादीत सिग्नल अ‍ॅप पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहे. भारताशिवाय जर्मनी, ऑस्ट्रिया, फिनलँड, हाँग काँग आणि स्विझर्लंड या देशांमध्येही सिग्नल टॉप डाउनलोड अ‍ॅप ठरलं आहे.

सिग्नलची विशेषत:

सिग्नल अ‍ॅपद्ववारे तुमचा पर्सनल डेटा मागितला जात नाही किंवा स्टोअरही केला जात नाही. त्यामुळे हा डेटा कोणासोबत शेअर करण्याचा प्रश्नच येत नाही. सिग्नलवर फक्त तुमचा फोन नंबर स्टोअर केला जातो. ग्रुप व्हिडिओ कॉलिंग आणि जुने मेसेज आपोआप गायब होण्याचं फिचरही यामध्ये आहे. याशिवाय सिग्नलची खासियत म्हणजे यात ‘डेटा लिंक्ड टू यू’ फिचरही दिले आहे. हे फिचर सुरू केल्यानंतर कोणीही चॅटिंग करताना चॅटचा स्क्रीनशॉट घेऊ शकत नाही. म्हणजेच तुमची चॅटिंग पूर्णतः सुरक्षित असते.

एलन मस्क यांच्या ट्विटनंतर वाढली लोकप्रियता

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील आघाडीची कंपनी टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटरवर सिग्नल अ‍ॅप वापरण्याचे आवाहन केले होते. मस्क यांनी आपल्या 41.5 मिलियन फॉलोअर्सना सिग्नल वापरण्याचे आवाहन केल्यापासून या अ‍ॅपच्या डाउनलोडिंगमध्ये वाढ झाली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *