महाविकास आघाडीचा विधानसभा अध्यक्षांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव

महाविकास आघाडीचा विधानसभा अध्यक्षांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव

नागपूर । वृत्तसंस्था Nagapur

नागपूरमध्ये विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात (winter session of the Legislature ) सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या या हल्ल्यात आता महाविकास आघाडीने ( Mahavikas Aaghadi )विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.

काँग्रेसचे आमदार सुनिल केदार, सुरेश वरपुडकर, शिवसेनेचे आमदार सुनील प्रभु आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांना अविश्वास प्रस्तावाबाबतचे हे पत्र दिले. या पत्रावर महाविकासआघाडीच्या 39 आमदारांच्या स्वाक्षरी आहेत.

विरोधी पक्षातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी सभागृहात बोलू न दिल्याचा आरोप केला आहे. कर्नाटकविरोधात आणि सीमावासीयांच्या पाठिंब्यासाठी ठराव मंजूर करताना विरोधी पक्षाच्या आमदारांना बोलण्याची परवानगी मागूनही नाकारण्यात आल्याचाही आरोप झाला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com