मुलाने केली आईवडिलांची हत्या; डबल मर्डरने निफाड तालुका हादरला
Breaking News

मुलाने केली आईवडिलांची हत्या; डबल मर्डरने निफाड तालुका हादरला

निफाड/लासलगाव | प्रतिनिधी Niphad/Lasalgaon

डबल मर्डरच्या घटनेने निफाड तालुका हादरला आहे. तालुक्यातील खडक माळेगाव येथे मुलानेच आई वडिलांची हत्या केल्याची घटना घडली आहे. मुलगा मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती आहे.....

घरात होत असलेल्या सततच्या वादातून आई वडील आणि मुलगा यांच्यात भांडण झाले. भांडणाचे पर्यावसान हाणामारीत झाले. यात मुलाने वडिलांच्या डोक्यात दगड घातल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

तर आईचादेखील या झटापटीत मुलाने खून केला. दत्तू रामदास सुडके असे या मनोरुग्ण मुलाचे नाव आहे. तर रामदास व सरूबाई असे खून झालेल्या मुलाच्या आईवडिलांचे नावे आहेत.

या घटनेची माहिती लासलगाव पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर तात्काळ पोलीस ठाण्याची अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. संशयित मुलाला ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com