Friday, April 26, 2024
Homeजळगावआई आणि पत्नीच्या डोक्यात फ्रायपॅन घालून निर्घुण हत्या

आई आणि पत्नीच्या डोक्यात फ्रायपॅन घालून निर्घुण हत्या

भुसावळ Bhusawal। प्रतिनिधी

येथील राजेश राका यांच्या वांजोळ रोड येथील नव्याने आकार घेत असलेल्या शगुन इस्टेट (Shagun Estate) मधील एका इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर भाड्याने राहत असलेल्या एका 35 वर्षीय रेल्वे कर्मचार्‍याने (railway employee) रागाच्या(anger) भरात पत्नी व आईची (Wife and mother) निर्घृण हत्या (Brutal murder) केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली असून आरोपीस अटक (Accused arrested) करण्यात आली आहे.

- Advertisement -

अमळनेरचा अट्टल गुन्हेगार अमरावती येथे स्थानबद्ध

याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळी जावून माहिती घेतली असता असे समजले की, राजेश राका याच्या वांजोळ रोड भागातील शगुन इस्टेट या परिसरातील ध्वज अपार्टमेंटच्या दुसर्‍या मजल्यावर कल्पना अविनाश नेमाउे यांच्या मालकीचा फ्लॅट आहे. तेथे भुसावळ रेल्वेच्या पीओएच भागातील हेमंत भुषण (वय 35) हा बिहारी युवक आठ ते दहा महिन्यापासून येथे भाडे तत्वावर राहत होता. सहा महिन्यापुर्वी त्याचा गावाकडे बिहारला विवाह झाला होता. लग्नापासून पत्नीची व त्याची अनबन होती.

या विषयावरून आई व त्याचे नेहमी खटके उडत होते. गेल्या काही दिवसापासून आई व पत्नी भुसावळला राहायला आल्या होत्या. सासु-सुनेचा वाद सुरू असल्याने रात्री 1 वाजेपासुनच मला झोप लागली नाही. मला कामावर जावे लागते, झोप होत नाही असे म्हणत पहाटे चारच्या सुमारास हेमंत भुषण याने बेडरूममध्ये असलेल्या पत्नी आराध्या हेमंत हिच्या कपाळावर लोखंडी फ्रायपॅन जोरदार प्रहार करून तिची हत्या केली तर आई सुशिलाबाई म्हणाली तिला कशाला मारतो मला मार असे म्हटले असता त्याने आईच्या डोक्यातही धारदार लोखंडी चाबीने वार केला.

चार युवकांचा पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्नगावठी कट्टा घेऊन फिरणारा बोदवड पोलिसांकडून जेरबंद

आई देखील रक्ताच्या थारोळ्यात पडली, या आवाजाने शालक उठला असता त्याच्यावरही हल्ला केला परंतु तो कसा बसा जीव मुठीत घेवून पळाल्याने त्याच जीव वाचला आहे. जखमी शालक ऋषभ (वय 40) याला प्रथम रिदम हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले तेथून पुढे सामान्य रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेचे वृत्त समजतात सकाळी साडेपाच वाजता पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे व पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी सर्वात आधी आरोपी हेमंत भूषण याला ताब्यात घेतले व पुढील कारवाई केली. हेमंत भुषणच्या विरुद्ध डबल मर्डरचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Bad News photos # पूणे मेहकर बसच्या अपघातात सहा जण ठार

फॉरेन्सिकची एक टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे. त्यांनी खुनाचे व संबंधित सर्व नमुने गोळा केले. जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासकामी मार्गदर्शन केले. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश गोठला व त्यांचे सहकारी करीत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आरोपी आंघोळ करून अगदी तयार होता

आई व पत्नीचा खुन केल्यानंतर आरोपी याने कुठलीही भिती न बाळगता अथवा घाबरून पळून न जाता त्याने छान पैकी घराच्या बाथरूमध्ये जावून शॉवरखाली थंड पाण्याने आंघोळ केल. निवांत कपडे बदलले व आईच्या मृतदेहा जवळ येवून अगदी निर्विकारपणे बसुन असल्याचा तो पोलिसांना आढळून आला. पोलिसांसमोर त्याने झाल्या घटनेची हकीकत अगदी काहीही संकोच न करता कथन केली.

सहा महिन्यापुर्वीच लग्न; मात्र दररोज वाद

आरोपी हेमंत भुषण हा भुसावळ येथील रेल्वेच्या पीओएच मध्ये कामाला आहे. सहा महिन्यापुर्वी विवाह झाला व काही दिवसांपूर्वीच आई व पत्नी भुसावळला राहायला आल्या होत्या. पत्नी व त्याचे नेहमी भांडण होत असत. चार दिवसांपासून भांडण होत असल्याने त्याचा शालक हा वाद मिटविण्यासाठी आला होता. मात्र मंगळवारी पहाटेच या माथेफिरूने दोघांना ठार केले व शालकावरही जिवघेणा हल्ला केला, असे वॉचमनने सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या