Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याअवकाळी पावसाने द्राक्ष व कांद्याचे सर्वाधिक नूकसान

अवकाळी पावसाने द्राक्ष व कांद्याचे सर्वाधिक नूकसान

नाशिक । प्रतिनिधी Nashik

अवकाळी पावसाने जिल्ह्यात द्राक्ष व कांद्याचे अतोनात नूकसान झाले आहे. 3 हजार 400 हेक्टरवरील पिके आडवी झाली असून 217 गावातील पाच हजार 460 शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. चांदवड, सटाणा तालुक्यात द्राक्ष व कांद्याला फटका सहन करावा लागला आहे. अंतिम पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासनाकडे मदतीचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

- Advertisement -

गेल्या चार,पाच दिवसांपासून अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपले. एक ते दीड तास पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे कांदा आणि द्राक्ष पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक पाहणी अहवालानुसार चांदवड तालुक्यात द्राक्षांचे सर्वाधिक नुकसान झाले, तर सटाणा तालुक्यात कांद्याला फटका बसला.

पावसामुळे कांदा लागवड देखील लांबली असल्याने शेतकर्‍यांचे नियोजन बिघडणार आहे. जिल्ह्यातील 5,460 शेतकर्‍यांना त्याचा फटका बसला असून 2,508 हेक्टर वरील द्राक्षांचे तर 890हेक्टरवरील कांदा आणि इतर पिके असे 3398 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात 3 हजार 398 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून त्यात 217 गावे बाधित झाली आहेत. जिल्ह्यात जवळपास 2 लाख 70 हजार 760 शेतकर्‍यांनी पिकांचा विमा उतरवलेला आहे. ज्या शेतकर्‍यांनी विमा उतरवला नाही त्यांना मदत देण्यासंदर्भातला प्रस्ताव शासनाला जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातुन पाठवला जाईल.

छगन भुजबळ , पालकमंत्री

- Advertisment -

ताज्या बातम्या