
जामनगर | Jamnagar
मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या एका विमानात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीने खळबळ माजली. त्यानंतर गुजरातमधील जामनगर विमानतळावर याचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
या विमानात २३६ प्रवासी आणि आठ क्रू मेंबर्स असल्याची माहिती आहे. दरम्यान, बॉम्बशोधक पथकाच्या तपासानंतर कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसून सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती गुजरात पोलिसांकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रशीयाच्या एका व्यक्तीला सदर विमानात बॉम्ब असल्याचा धमकीचा फोन आला होता. दरम्यान घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना केल्या आहेत. धमकी नेमकी कोणी दिली होती याचा शोध लवकरच घेतला जाईल, असे संबंधित अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.