बापरे! नाशकात सहा महिन्यानंतर प्रथमच करोनाबाधितांची हजारीपार

बापरे! नाशकात सहा महिन्यानंतर प्रथमच करोनाबाधितांची हजारीपार
करोना अपडेट

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यात गेल्या २४ तासात १ हजार १०३ रुग्ण करोनाबाधित (Corona Patients) झाले असल्याने जिल्ह्यात एकूण ३ हजार ५५० रुग्ण सध्या उपचार घेत आहे. सहा महिन्यानंतर प्रथमच रुग्णांची संख्या हजारपार गेली आहे...

त्यामुळे जिल्हा प्रशासनासह नागरिकांचीदेखील चिंता वाढली आहे. शहरात हे प्रमाण सर्वाधिक असून नागरिकांनी गर्दी टाळण्याचे आणि करोनासाठी (Corona) असलेली त्रिसूत्री वापरण्याचे आवाहन वेळोवेळी प्रशासनातर्फे केले आहे.

गेल्या २४ तासात दाखल झालेल्या रुग्णांमध्ये ८५७ रुग्ण एकट्या नाशिक महापालिका (Nashik NMC) क्षेत्रातील असून ग्रामीण भागातील (Nashik Rural) बाधित रुग्णांनीही दोनशेचा आकडा पार केलेला आहे.

मालेगाव (Malegaon) महापालिका कार्यक्षेत्रात देखील ६ रुग्ण आढळून आलेले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख १७ हजार ७४१ रुग्ण बाधित झाले असून ४ लाख ०५ हजार ४२८ रुग्ण पूर्णपणे बरे झालेले आहेत.

तिसऱ्या लाटेत (Corona Third Wave) करोनाचा संसर्ग झपाटयाने होत असल्याचे समोर आले आहे. नाशिक जिल्हयातही (Nashik District) करोनाचा धोका वाढू लागला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ३ हजार ५५० रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com