11th Admission : विशेष फेरीनंतरही आठ हजारांहून अधिक जागा रिक्त

11th Admission : विशेष फेरीनंतरही आठ हजारांहून अधिक जागा रिक्त

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेंतर्गत (11th Admission) पहिली, दुसरी व तिसरी गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी (Special Round) राबविण्यात आली…

या फेरीचे प्रवेशही नुकतेच पूर्ण झाले असून अजूनही शहरातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांत ८ हजार ९८३ जागा रिक्त आहे. तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी अजूनही प्रवेशाच्या प्रतीक्षेत असल्याने या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागातर्फे पुन्हा दुसरी विशेष फेरी राबविली जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत अकरावीचे १६ हजार ३९७ प्रवेश पूर्ण झाले आहेत.

अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या पहिल्या तिन्ही फेऱ्यांमध्ये १२ हजार ४७८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यानंतर विशेष फेरीअंतर्गत ४ हजार ४८४ विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यांना प्रवेशासाठी २५ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती.

विशेष फेरीत ३ हजार २६६ विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळाले. या विशेष फेरीनंतरही मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रतीक्षेत आहे. त्यामुळे दुसरी विशेष फेरी राबविली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

याबाबत लवकरच https://11thadmission.org.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Related Stories

No stories found.