हुक्का पार्टीने इगतपुरी पुन्हा हादरले; ७० हून अधिक जणांना बेड्या

हुक्का पार्टीने इगतपुरी पुन्हा हादरले; ७० हून अधिक जणांना बेड्या

पोलीस अधीक्षकांची मोठी कारवाई

इगतपुरी | वार्ताहर | Igatpuri

इगतपुरी (Igatpuri) येथील त्रिंगलवाडी हद्दीतील एका हॉटेलवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी (Nashik Rural Police) छापा मारून हुक्का पार्टी (Hookah party) उद्ध्वस्त केली आहे. या पार्टीत सुमारे 70 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्याची माहिती माहिती मिळत आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, माउंट शॅडो हॉटेलमध्ये शनिवारी रात्री हुक्का पार्टी रंगल्याची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या हॉटेलवर छापा टाकला.

यावेळी जवळपास वीस ते पंचवीस महिला आणि पन्नास ते पंचावन्न पुरुष एकत्र येऊन हुक्का पार्टी करत असल्याचे निदर्शनास आले. सुमारे ७० हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिना पांचाळची रेव्ह पार्टी चर्चेत

काही काळापूर्वी इगतपुरीतील एका हाय प्रोफाइल रेव्ह पार्टीवर काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी छापा मारला होता. त्यावेळी 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री हीना पांचाळसह 22 जणांना बेड्या ठोकल्या होत्या. विशेष म्हणजे ही कारवाईदेखील शनिवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली होती.

ही पार्टी इगतपुरीतील स्काय ताज व्हिला बंगल्यात सुरू होती. यावेळी हीनासह एक परदेशी महिला, मराठी आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील अभिनेत्री, दोन महिला कोरिओग्राफर नशेत तल्लीन होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com