नाशिक विभागात चार हजार कोटीहून अधिक खरीप पीक कर्ज वाटप

'इतक्या' शेतकऱ्यांना मिळाला सरसकट लाभ
नाशिक विभागात चार हजार कोटीहून अधिक खरीप पीक कर्ज वाटप

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

खरीप हंगामासाठी (Kharif season) विभागातील नाशिक (Nashik), जळगाव (Jalgaon), अहमदनगर (Ahmednagar), धुळे (Dhule) आणि नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यात खरीप पीक कर्जाचे (Kharif crop loan) वाटप झाले आहे...

आजपर्यंत विभागात 4 लाख 58 हजार 35 हेक्टर क्षेत्रासाठी 4 हजार 801 कोटी 54 लाख रुपयांचे पीक कर्जाचे वाटप झाले आहे. नाशिक विभागात एकूण 47 टक्के पीक कर्जाचे वाटप झाले आहे. या पीक कर्जाचा लाभ विभागातील 5 लाख 91 हजार 498 शेतकऱ्यांना मिळाला असल्याची माहिती सहकार विभागाच्या विभागीय सहनिबंधक ज्योती लाठकर (Jyoti Lathkar) यांनी दिली.

खरीप हंगाम 2022-23 करिता विभागातील एकूण उद्दीष्ट 10 हजार 119 कोटी 74 लाखाचे असून त्यापैकी 4 हजार 801 कोटी 54 लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप झाले आहे. संपूर्ण विभागात आतापर्यंत 47 टक्क्यापर्यंत कर्जवाटपाचे काम झाले आहे. कर्जवाटपात जिल्हा मध्यवर्ती बँकेने 96 टक्के इतके लक्षणीय असे कर्ज वाटप करण्यात आले.

नाशिक जिल्ह्यात 73 हजार 535 शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप

नाशिक जिल्ह्याला खरीप पीक कर्जाचे 2 हजार 947 कोटी रुपयांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यापैकी आत्तापर्यंत 38 हजार 136 हेक्टर क्षेत्रासाठी 1 हजार 221 कोटी 43 लाख रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. जिल्ह्यात 41 टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. या पीक कर्जाचा लाभ 73 हजार 535 शेतकऱ्यांना झाला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून 70 टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात 3 लाख 15 हजार 914 शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप

अहमदनगर जिल्ह्याला खरीप पीक कर्जाचे 4 हजार 141 कोटी 52 लाख रुपयांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यापैकी आत्तापर्यंत 2 लाख 36 हजार 372 हेक्टर क्षेत्रासाठी 2 हजार 330 कोटी 38 लाख रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाचे काम आत्तापर्यंत 56 टक्के झाले आहे. या पीक कर्जाचा लाभ 3 लाख 15 हजार 914 शेतकऱ्यांना झाला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून 101 टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.

धुळे जिल्ह्यात 31 हजार 071 शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप

धुळे जिल्ह्याला खरीप पीक कर्जाचे 713 कोटी 1 लाख रुपयांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यापैकी आत्तापर्यंत 24 हजार 128 हेक्टर क्षेत्रासाठी 369 कोटी 63 लाख रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत 52 टक्के पीक कर्जाचे वाटप झाले आहे. या पीक कर्जाचा लाभ 31 हजार 071 शेतकऱ्यांना झाला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून 131 टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.

जळगांव जिल्ह्यात 1 लाख 58 हजार 882 शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप

जळगांव जिल्ह्याला खरीप पीक कर्जाचे 1 हजार 714 कोटी 81 लाख रुपयांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यापैकी आत्तापर्यंत 1 लाख 42 हजार 153 हेक्टर क्षेत्रासाठी 733 कोटी 53 लाख रुपयांचे वाटप झाले आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाचे काम 43 टक्के झाले आहे. या पीक कर्जाचा लाभ 1 लाख 58 हजार 882 शेतकऱ्यांना झाला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून 89 टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.

नंदुरबार जिल्ह्यात 12 हजार 96 शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप

नंदुरबार जिल्ह्याला खरीप पीक कर्जाचे 603 कोटी 41 लाख रुपयांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यापैकी आत्तापर्यंत 17 हजार 246 हेक्टर क्षेत्रासाठी 146 कोटी 56 लाख रुपयांचे वाटप झाले आहे. जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाचे काम आत्तापर्यंत 24 टक्के झाले आहे. पीक कर्जाचा लाभ 12 हजार 96 शेतकऱ्यांना झाला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून 146 टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com