
नवी दिल्ली | वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून हिजाबच्या वादावर इराणमधील (Iran Hijab Controversy) विविध शहरांमध्ये निदर्शने होत आहेत. त्यामुळे इराणमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण आहे. या निदर्शनांमध्ये आतापर्यंत ३०० हून अधिक नागरिकांचे निधन (Death of citizens) झाल्याची माहिती समोर आली असून हा आकडा थक्क करणारा आहे...
इराणचे रिव्होल्युशनरी गार्ड जनरल अमीराली हाजीजादेह (Amirali Hajizadeh) यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिजाबच्या विरोधातील निदर्शनांमध्ये आतापर्यंत ३०० हून अधिक नागरिकांचे निधन झाले असून या घटनेत महिला आणि पुरुषांसह अनेक चिमुकल्यांना आपले प्राण गमावावे लागले आहेत.
दरम्यान, पोलीस कोठडीत (Police Custody) महसा अमिनीच्या (Mahsa Amini) निधनानंतर देशातील नागरिकांमध्ये संताप असल्याचे हाजीजादेह यांनी म्हटले आहे. तसेच याप्रकरणी १८ हजारांहून अधिक नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे.