गोदापात्रात सापडला २७५ वर्षांपेक्षा अधिक जुना कोरीव कासव

गोदापात्रात सापडला २७५ वर्षांपेक्षा अधिक जुना कोरीव कासव

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गोदावरी नदी पात्रातील गोपिकाबाई तासचा पायऱ्यांवर २७५ वर्षे जुना दगडात कोरीव कासव सापडला.

सन १७६१-१७७२च्या काळात गोपिकाबाई पेशवे यांनी निर्माण केलेल्या "गोपिकाबाई तास" चा पायऱ्या वरील सिमेंट-काँक्रिट काढून तासचे विस्तारीकरणचे कार्य नाशिक स्मार्ट सिटी कंपनी मार्फत प्रगतीपथावर आहे. सदरहू कार्य सुरू असताना, नदी पात्रातील पायऱ्यांवर दगडात कोरीव कासव सापडला आहे.

सन १९९१ व तद्नंतर २००२ मध्ये नाशिक महानगरपालिकेने गोदावरी नदी पात्रात तळ सिमेंट - काँक्रिट केल्यामुळे दगडातील कोरीव कासव भग्न अवस्थेत आहे.

" दगडातील कोरीव कासव हा २७५ वर्षे पेक्षा अधिक जुना दिसून येत आहे. हा सांस्कृतिक ठेवा व वारसा जपणे प्रशासनाचे आद्य कर्तव्य असून दगडी कासव ची देखभाल दुरस्ती करून त्याभागात कुढलेही विकास कार्य स्मार्ट सिटी कंपनीने करू नये."

~ गोदाप्रेमी देवांग जानी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com