धक्कादायक! करोनाकाळात भारतात २५ हजारांहून अधिक आत्महत्या, का उचलले टोकाचे पाऊल...?

धक्कादायक! करोनाकाळात भारतात २५ हजारांहून अधिक आत्महत्या, का उचलले टोकाचे पाऊल...?

दिल्ली | Delhi

देशात बेरोजगारीचा (unemployment) मुद्दा ऐरणीवर आलेला असताना धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. करोना (covid19) काळात बेरोजगारीला आणि कर्जबाजारीला (unemployment and indebtedness) कंटाळून जवळपास २५ हजारांपेक्षा जास्त भारतीयांनी आत्महत्या (suicide) केल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यसभेत बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय (Union Minister of State for Home Affairs Nityanand Rai) यांनी ही माहिती दिली. ही सगळी आकडेवारी नॅशनल क्राईम रेक़ॉर्डस ब्युरोच्या (National Crime Records Bureau- NCRB) हवाल्यानं देण्यात आल्याचंही केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले.

नित्यानंद राय (Nityanand Rai) यांनी दिलेल्या माहितीनुसार बेरोजगारीमुळे होत असलेल्या आत्महत्यांमध्ये मागील तीन वर्षात वाढ झाली आहे. करोना काळात म्हणजेच वर्ष २०२० मध्ये ३ हजार ५४८ जणांनी बेरोजगारीमुळे आयुष्य संपवलं. २०१८ मध्ये देशात २ हजार ७४१ जणांनी, तर २०१९ मध्ये २ हजार ८५१ जणांनी बेरोजगारीमुळे आत्महत्या केल्याचं सरकारने म्हटलं आहे.

कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्यांची संख्याही लक्षणीय आहे. सरकारी आकडेवारीनुसार २०१८ मध्ये ४ हजार ९७० जणांनी कर्जबाजारीपणामुळे मृत्यूला कवटाळलं. २०१९ मध्ये त्यात वाढ झाल्याचं दिसून ५ हजार ९०८ जणांनी आत्महत्या केली. २०२० मध्ये ५ हजार २१३ जणांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली.

दरम्यान राज्यसभेत बोलताना रॉय यांनी रोजगारासंबंधी सरकारडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबद्दलदेखील माहिती दिली. ते म्हणाले की, सरकारने आत्मनिर्भर भारत रोजगार योजना, नोकऱ्या शोधणार्‍यांसाठी आणि नोकऱ्यांसाठी रोजगार मिळवणाऱ्यांसाठी राष्ट्रीय करिअर सेवा प्रकल्प, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाद्वारे रोजगार आणि उत्पन्नवाढीसाठी अनेक कार्यक्रम सुरू केले आहेत.

याशिवाय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGS), पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, दीनदयाळ अंतोदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आणि भरीव खर्चासह प्रधानमंत्री कौशल विकास योजना आदींसंबंधीची देखील माहिती दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com