Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्या२४ तासात देशात कोविड-१९चे १ लाख ६८ हजार ९१२ पेक्षा अधिक नवे...

२४ तासात देशात कोविड-१९चे १ लाख ६८ हजार ९१२ पेक्षा अधिक नवे रुग्ण

नवी दिल्ली l New Delhi (सुरेखा टाकसाळ) :

गेल्या २४ तासात देशात कोविड-१९चे १ लाख ६८ हजार ९१२ पेक्षा अधिक नवे रुग्ण नोंदले गेले. यापैकी, ६३ हजार २९४ एकट्या महाराष्ट्रातील आहेत.

- Advertisement -

दिल्लीतही गेल्या २४ तासात कोविडचे १० हजार पेक्षा जास्त रूग्ण वाढले आहेत. केंद्र सरकार व्यापक लसीकरणावर भर देत आहे. तर, महाराष्ट्रासहीत काही राज्य सरकारांना कोविड प्रतिबंधक लशीच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे.

अशा स्थितीत, कोविड संबंधी तज्ञ समितीने ‘स्पुतनिक व्ही’, या रशियन करोना प्रतिबंधक लशीचा आणीबाणीच्या स्थितीत वापर करण्यास आज परवानगी दिली. या लशीची ९१.६ टक्के परिणामकता असल्याचे समजते. स्पुतनिक व्ही’ ही लस +२ ते +९ डिग्री या तापमानात राखली जात असल्याने भारतात तिचा वापर उपयुक्त ठरू शकतो.

या लशीसाठी ड्रग कंट्रोलर अॅथाॅरिटीची अंतीम परवानगी मिळाल्यानंतर भारतात, या लशीचे सुमारे ८५ कोटी डोस डाॅ. रेड्डीज् ही फार्मा कंपनी तयार करेल. सध्या भारतात सोळाशे व्यक्तींवर या लशीची चांचणी तिसऱ्या टप्प्यात आहे. यालशीचेही दोन डोस नागरिकंना घ्यावे लागतील.

कोविशिल्ड व कोव्हॅक्सीन या दोन लशींनंतर स्पुतनिक व्ही, ही तिसरी लस भारतीयांसाठी उपलब्ध असेल. या लशीचा वापर सुरू झाल्यानंतरच देशात लसीकरणाला अधिक वेग येईल.

दरम्यान, येत्या आॅक्टोबर महिन्यापर्यंत देशात आणखी ५ करोना प्रतिबंधक लशी उपलब्ध होतील, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

ताज्या घडामोडींमध्ये सर्वोच्य न्यायालयाचे ४४ कर्मचारी करोना बाधीत झाल्याने आढळल्यानंतर, या न्यायालयातील खटल्यांचे सुनावणींचे काम आॅनलाईन करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या