संमेलनात आरोग्याबाबत जास्त खबरदारी

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक । प्रतिनिधी Nashik

येत्या 3, 4 आणि 5 डिसेंबर रोजी शहरात होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 94th All India Marathi Convention आरोग्यासंबंधी जास्त काळजी घेण्यात येत आहे. करोनाच्या बदलत्या व्हेरिएंटमध्ये ओमिक्रॉन Omicron Virus व्हेरिएंटबाबतच्या काही उपयाययोजना प्रशासनाकडून सर्वांसाठी सुचवल्या जात आहेत. हा व्हेरिएंट करोनाच्या डेल्टापेक्षाही घातक असल्याने प्रशानानास धडकी भरली आहे. यापूर्वी करोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे एप्रिलमध्ये होत असलेले संमेलन पुढे ढकलण्यात आले होते. साधारणपणे दुसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे निदर्शनास आल्यावर संमेलनाचे नियोजन करण्यात येत आहे.

संमेलन अगदी नजीक आल्यावर हा ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळल्याने राज्यासह देशात टास्क फोर्सच्या बैठका मोठ्या प्रमणात घेतल्या जात आहेत. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सूचना दिल्या. जिल्हा प्रशासन याबाबत सतर्क झाले असून शासनाने नेमून दिलेली त्रिसूत्री कटाक्षाने पाळण्यात यावी, यासाठी अंमलबजावणी करण्यात येत आहे. महापालिका प्रशासनानेदेखील याबाबत जनजगृती करण्यास सुरुवात केली आहे.

साहित्य संमेलनाच्या पदाधिकार्‍यांनी यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दोन लस पूर्ण झालेल्यांनाच संमेलनात प्रवेश असणार आहे, असे सांगितले आहे. आता प्रवेशद्वारावर स्क्रीनिंग चाचणी करून ज्यांना काही लक्षणे आढळून आल्यास त्यांची लगेचच रॅपिड चाचणी करण्यात येणार आहे आणि पुढील तपासण्यादेखील करण्यात येणार आहेत.

नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत जिल्हा प्रशासन सतर्क आहे. यापूर्वीच सर्व नोडल अधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्या आहेत. नवा व्हेरिएंट घातक असून नागरिकांनी गाफिल राहू नये. राज्य शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब जिल्ह्यात केला जाणार आहे.

सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक Suraj Mandhare, Collector, Nashik

शहरात परदेशी नागरिक अथवा लक्षणे असलेल्यांच्या चाचण्या करण्यात येऊन त्यांच्यावर उपचार केले जातील. तसेच साहित्य संमेलनात रॅपिड चाचणी करण्यात येणार आहे. नागरिकांनी शासनाच्या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. लक्षणे वाटल्यास लगेचच चाचणी करून घ्यावी.

डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधिकारी, नाशिक मनपा

Dr. Bapusaheb Nagargoje, Medical Officer, Nashik Municipal Corporation

साहित्य संमेलनात शासनाची त्रिसूत्री अवलंबण्यात येणार आहे. संमेलनात बैठक व्यवस्थादेखील अतिशय सुटसुटीत करण्यात आली आहे. रसिकांची प्रवेशद्वारावर स्क्रीनिंग चाचणी केली जाणार आहे. दोन डोस झालेल्यांच्या हातावर शाई लावली जाणार आहे. या पद्धतीने नियोजन झाले असून शासनाकडून आणखी मार्गदर्शक सूचना येतील, त्यांचेही नियोजन करण्यात येईल.

डॉ. प्रशांत भुतडा, आरोग्य समितीप्रमुख, साहित्य संमेलन

Dr. Prashant Bhutada, Head of Health Committee, Sahitya Sammelan

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *