Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशगुजरात पूल दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती आली समोर; फिटनेस सर्टिफिकेटशिवाय....

गुजरात पूल दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती आली समोर; फिटनेस सर्टिफिकेटशिवाय….

गांधीनगर | Gandhinagar

गुजरातमधल्या मोरबी येथे रविवारी रात्री मृत्यूने अक्षरशः तांडव घातलं. मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला १४० वर्ष जुना झुलता पूल (केबल ब्रिज) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत भाजप खासदाराच्या १२ नातेवाईकांचा मृत्यू झाला असून, पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा १४१ वर पोहोचला आहे.

- Advertisement -

मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला १४० वर्ष जुना झुलता पूल दुरुस्ती करण्यात आल्यानंतर ५ दिवसांपूर्वी नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता. मात्र त्यासाठी मोरबी नगरपालिकेकडून फिटनेस सर्टिफिकेट घेण्यात आले नव्हते अशी धक्कादायक माहिती आता समोर येत आहे.

मार्च महिन्यात मोरबीतील ओरेवा ग्रुपला पुलाच्या देखरेखीचे आणि दुरुस्ती कंत्राट महापालिकेकडून देण्यात आले होते. हा ग्रुप ई बाईक्स तयार करतो. ब्रिज हा मोरबी महानगरपालिकेच्या मालकीचा आहे. पण तो काही महिन्यांपूर्वी दुरुस्ती आणि देखभालीसाठी १५ वर्षांकरीता ओरेव्हा ग्रुपला देण्यात आला होता. त्यांनी दुरुस्तीनंतर महानगपालिकेला माहिती न देताच पर्यटकांसाठी तो सुरू केला.

ब्रिजचे सेफ्टी ऑडिटही झाले नसल्याचे मोरबी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दुरुस्तीचे काम झाल्यानंतर पूल सुरू करम्यात आला होता. या पुलाच्या फिटनेसचं सर्टिफिकेट मात्र महापालिकेनं अद्याप दिलं नव्हतं असंही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले.

- Advertisment -

ताज्या बातम्या