अखेर महाराष्ट्रातून मान्सूनची माघार; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

अखेर महाराष्ट्रातून मान्सूनची माघार; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

मुंबई | Mumbai

मागील चार महिन्यांपासून राज्यात मान्सूनने (Monsoon)धुमाकूळ घातला होता. तसेच राज्यातील काही भागात परतीचा पाऊस सुरू होता. त्यानंतर आता जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीत राज्यात सुरु असलेला मान्सून माघारी परतणार असल्याची माहिती हवामान विभागाने (Meteorological Department) दिली आहे....

महाराष्ट्रातून (Maharashtra) ओलावा कमी झाल्याने २०२२ च्या मान्सूनच्या समाप्तीची घोषणा हवामान विभागाने केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर मुंबई, पुण्यासह संपूर्ण राज्यात (दि.२८) ऑक्टोबरपर्यंत सर्वत्र कोरडे वातावरण राहील असा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच कालपासून पावसाने (Rain) थोडी विश्रांती घेतल्याने राज्यात थंडीची (cold) चाहूल लागली आहे.

तर बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाला (Hurricane) थायलंडने 'सितरंग' असे नाव दिले असून आज (दि.२३) रोजी सकाळीच त्याने वेग घेतला आहे. याशिवाय उद्या (दि.२३) रोजी 'सितरंग'चे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होणार असल्याने भारतीय किनारपट्ट्याना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, हवामान विभागाने जाहीर केल्याप्रमाणे या चक्रीवादळाचा महाराष्ट्रात परिमाण होणार नाही. याशिवाय चक्रीवादळ बंगालच्या उपसागरातच राहणार असून ते भारतीय किनारपट्ट्यात (Indian coast) धडकणार नाही असा अंदाजही आहे. तसेच मुंबई, पुण्यासह उर्वरित महाराष्ट्रातून मान्सून परतला असला तरी अवकाळी स्वरूपाचा पाऊस (Unseasonal rain) होण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com