Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्या'या' तारखेपासून मान्सून परतणार

‘या’ तारखेपासून मान्सून परतणार

मुंबई | Mumbai

राज्यात उन्हाचा (Heat) चटका लागत असून उकाड्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे मान्सूनच्या (Monsoon)परतीची चाहूल लागली आहे. तर काल (दि.२६) राज्यातील मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान (Weather) असल्याने दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती. तर आज (दि.२७) उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने (Department of Meteorology) दिला आहे…

- Advertisement -

उत्तर पंजाब आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून (sea level)१.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या प्रणालीपासून बिहारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पूर्व पश्चिम पट्टा सक्रिय आहे. तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम असून ५ ते १० ऑक्टोबर या कलावधीत परतीचा पाऊस थांबण्याची शक्यता आहे.

तसेच मान्सूनने वायव्य भारतातून परतीचा प्रवास सुरू केला असून मागच्या आठवड्यात राजस्थानच्या खाजूवाला, बिकानेर, जोधपूर, आणि गुजरातच्या नालिया पर्यंतच्या भागातून मान्सून परतला आहे. त्यानंतर परतीच्या (Return) प्रवासात कोणतीही वाटचाल झालेली नसून काल (दि.२६) रोजी मान्सूनच्या परतीची सीमा कायम होती. तर परतीसाठी पोषक हवामान झाल्याने येत्या दोन ते तीन दिवसांत वायव्य आणि मध्य भारताच्या काही भागातून मान्सून परत जाण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या