आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन

आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन

नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi

संसदेचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session of Parliament)आज सोमवारपासून (दि.18) सुरू होत आहे. या अधिवेशनात वाढती महागाई( Inflation), बेरोजगारी((Unemployment )) तसेच स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या वाढत्या किंमती, अग्निपथ, अर्थव्यवस्था, नियंत्रण रेषेवरील चीनची घुसखोरी, ईडीचा गैरवापर आदी अनेक मुद्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती काँग्रेससह विरोधी पक्षांनी आखली आहे. याउलट विरोधकांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी सत्ताधार्‍यांनी कंबर कसली आहे.

संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह सत्ताधारी व विरोधकांचे बहुतेक नेते उपस्थित होते. या अधिवेशनात राष्ट्रपती व उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. त्यामुळे या अधिवेशनाला महत्व प्राप्त झाले आहे. देशहिताच्या मुद्यांवर सर्वपक्षीय नेत्यांनी अधिवेशनात चर्चा करून सभागृहाचे काम सुरळीत चालण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन बिर्ला यांनी केले.

पंतप्रधानांची अनुपस्थिती

संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दांडी मारली. मोदी यांच्या अनुपस्थितीवर काँग्रेसने आक्षेप घेतला. सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधानांनी अनुपस्थित राहण्यावर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संसदेच्या अधिवेशनावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक होत असताना पंतप्रधान नेहमीप्रमाणे अनुपस्थित आहेत, अशा शब्दांत रमेश यांनी ट्विट करून पंतप्रधानांवर निशाणा साधला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com