जयकुमार रावल, गिरीश महाजनसह १२ आमदार वर्षभरासाठी निलंबित

जयकुमार  रावल,  गिरीश  महाजनसह १२ आमदार वर्षभरासाठी निलंबित

मुंबई :

पावसाळी अधिवेशनाचा (monsoon season ) सुरुवात वादळी ठरली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या (bjp) आमदारांनी जोरदार गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज बंद पाडले. त्यामुळे आता भाजपच्या जयकुमार रावल, (jaykumar rawal) गिरीश महाजनसह (girish mahajan) १२ आमदार (mla) वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले.

राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ (chagan bhujbal ) यांनी ओबीसी (obc) आरक्षणाबाबतचा ठराव मांडला. पण, बोलू दिलं नाही म्हणून भाजपचे आमदार तालिका अध्यक्षांसमोर येऊन जोरदार गोंधळ घातला. यावेळी सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, अनिल परब यांची बैठक पार पडली. सभागृहातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यानंतर भाजपचे डझनभर आमदार निलंबित केले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

भाजपचे आमदार जयकुमार रावल, गिरीश महाजन, अभिमन्यू पवार, आशिष शेलार, अतुल भातखळकर, संजय कुटे, पराग आळवणी, हरिष मारूती आप्पासह १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com