Monsoon Update : यंदाचा मान्सून कसा असेल? हवामान विभागाचा दुसरा अंदाज जाहीर

File Photo
File Photo

दिल्ली | Delhi

यंदाचा मान्सून उशिराने दाखल होणार असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्याता आला होता. पण यावर आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाचा (Indian Meteorological Department) मान्सून (Monsoon) संदर्भात दुसरा अंदाज जाहीर झाला आहे.

जून ते सप्टेंबर दरम्यान मान्सून सरासरी ९६ टक्के संपूर्ण भारतात कोसळण्याची शक्यता आहे. देशात जून महिन्यात मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. देशात अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याचा अंदाज आहे.

मराठवाडा, विदर्भ जून महिन्यात कमी पाऊस तर संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक तापमानाची शक्यता आहे. दीर्घ काळासाठी म्हणजे जून-सप्टेंबर महिन्यात दिलेल्या अंदाजात महाराष्ट्रात मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. अल निनोसाठी अनुकूल वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली आहे. मान्सूनमध्ये अल निनोचा प्रभाव बघायला मिळण्याची दाट शक्यता असल्याचे देखील भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.

शुक्रवारी मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मान्सूपूर्व पाऊस झाला. मुंबईत सकाळी पाच वाजता अनेक भागांत पाऊस पडला. मुंबई उपनगरातील कांदिवली, मालाड, गोरेगाव आणि बोरिवलीच्या काही भागात पाऊस पडत आहे. पावसाच्या हलक्या सरी पडल्याने नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला असून, त्यामुळे आर्द्रताही वाढली आहे. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाऊस झाला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com