Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशखूशखबर : सलग तिसऱ्या वर्षी चांगला पाऊस : पाहा, कोणत्या महिन्यात किती...

खूशखबर : सलग तिसऱ्या वर्षी चांगला पाऊस : पाहा, कोणत्या महिन्यात किती पाऊस

नवी दिल्ली

उन्हाळा सुरु होताच पावसाळ्याकडे लक्ष लागले असते. यंदा पाऊस कसा असणार? यावर अंदाज वर्तवला जातो. सलग दोन वर्ष देशात सामन्य पाऊस झाल्यानंतर यंदाही मॉन्सून चांगला असणार आहे. यंदा सरासरीच्या तुलनेत पाऊस १०३ टक्के इतका राहण्याचा स्कायमेटचा अंदाज आहे. Monsoon likely to be normal for third consecutive year

- Advertisement -

दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, या आहेत नवीन तारखा

स्कायमेट खासगी हवामान पाहणी संस्था आहे. दरवर्षी जून महिन्याच्या सुरुवातीपासून मॉन्सूनच्या पावसाला सुरुवात होते. भारतातील अनेक भागांत सप्टेंबरपर्यंत मॉन्सून सक्रिय असतो. देशात पावसाची सरासरी ८८०.६ मिलिमीटर आहे. स्कायमेटचा अंदाजनुसार देशात यंदा ९०७ मिलिमीटर इतका पाऊस पडेल. याशिवाय हा अंदाज खरा ठरला तर सलग तिसऱ्या वर्षी देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल. वर्ष २०१९ मध्ये सरासरीच्या तुलनेत ११० टक्के तर २०२० मध्ये सरासरीच्या तुलनेत १०९ टक्के इतका पाऊस पडला होता.

जगभरातील सर्व लसी भारतात मिळणार

२०२१ मध्ये असा असणार पाऊस

जूनमध्ये 166.9 मिमी म्हणजेच 106%

• 70% शक्यता सामान्य पाऊस

• 20% शक्यता सामान्यापेक्षा जास्त

• 10% शक्यता सामान्यापेक्षा कमी

जुलै महिन्यात 289 मिमी म्हणजेच 97% पाऊस

• 75% शक्यता सामान्य पाऊस

• 10% शक्यता सामान्यापेक्षा जास्त

• 15% शक्यता सामान्यापेक्षा कमी

ऑगस्ट महिन्यात 258.2 मिमी म्हणजेच 99% पाऊस

• 80% शक्यता सामान्य पाऊस

• 10% शक्यता सामान्यापेक्षा जास्त

• 10% शक्यता सामान्यापेक्षा कमी

सप्टेंबर महिन्यांत 170.2 मिमी म्हणजे 116% पाऊस

• 30% शक्यता सामान्य पाऊस

• 60% शक्यता सामान्यापेक्षा जास्त

• 10% शक्यता सामान्यापेक्षा कमी

१९९६, १९९७ आणि १९९८ मध्ये सलग तीन वर्षे पावसाचे प्रमाण सामान्य राहिले होते. यंदा जुलैमध्ये महाराष्ट्रासह छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेशात चांगला पाऊस पडणार आहे. तर पुर्वेकडील भागात आणि कर्नाटकमध्ये सामान्यापेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये मध्य प्रदेश आणि देशाच्या पश्चिम भागात चांगल्या पावसाची शक्यता आहे.

जीपी शर्मा, स्कायमेट

- Advertisment -

ताज्या बातम्या