Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्र1 जूनला मान्सूनचे केरळात येणार, राज्यात या तारखेपर्यंत आगमन

1 जूनला मान्सूनचे केरळात येणार, राज्यात या तारखेपर्यंत आगमन

मुंबई

भारतात सलग तिसऱ्या वर्षी मान्सून जोरदार बरसण्याचा अंदाज यापुर्वीच भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला होता. त्याचे आगमन केरळमध्ये वेळेवरच होणार असे गुरुवारी हवामान विभागाने पुन्हा स्पष्ट केले. प्रतिवर्षाप्रमाणे १ जून रोजी त्याचे केरळमध्ये आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात 10 जून पर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हवामान विभागाने मान्सूनचा दुसरा अंदाज आज जाहीर केला. त्यानुसार 1 जूनला मान्सूनचे केरळात आगमन होण्याची शक्यता आहे. सरासरी 10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होणार आहे. 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापण्याचा अंदाज आहे. मागील दोन वर्षात अरबी समुद्रातील वादळामुळे महाराष्ट्रात मान्सून लांबला होता. मात्र, सध्या अशी कोणतीही चिन्ह दिसत नसल्याची माहिती हवामान विभागाने दिली. यामुळे केरळात जर मान्सून वेळेवर दाखल झाला तर महाराष्ट्रातही वेळेवर दाखल होण्याचा अंदाज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या