
मुंबई | Mumbai
भारतीय हवामान विभागाच्या (indian meteorological department) अंदाजानुसार यंदा मान्सून (monsoon 2022) वेळेआधीच दाखल होणार आहे. दरवर्षी अंदमानमध्ये पाऊस २२ मेपर्यंत दाखल होतो.
मात्र, यंदा पाऊस १३ ते १९ मे दरम्यान म्हणजेच वेळेआधी दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर २० ते २६ मेपर्यंत पाऊस केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तर तळकोकणात २७ मे ते २ जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने पुढील चार आठवड्यांच्या हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. पाऊस सुरु होण्याची तारीख हवामान विभागाकडून १५ रोजी जाहीर होणार करण्यात येईल. अंदमानच्या समुद्रावर १३ ते १९ मे दरम्यान मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. दरवर्षी अंदबारमध्ये मान्सून २२ मेपर्यंत दाखल होतो. मात्र यंदा मान्सून वेळे आधी दाखल होणार आहे.
पुणे हवामान विभागाचे प्रमुखे कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत पावसाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं आहे की, मआगामी पहिल्या आठवड्यात अंदमानानवर मान्सून दाखल होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात अरबी समुद्रावर पाऊस होईल आणि त्यानंतर पुढील आठवड्यात भारतात मान्सून दाखल होईल.