जून संपला, पाऊस फक्त १७ टक्के, पेरण्या संकटात

जून संपला, पाऊस फक्त १७ टक्के, पेरण्या संकटात

नाशिक

हवामान विभागाने यंदा सरासरी पावसाचा अंदाज वर्तवला होतो. परंतु जून महिना संपल्यानंतरही नाशिक जिल्ह्यात पावसाची परिस्थिती बिकट आहे. यंद मान्सून चांगला बरसण्याच्या शक्यता आतापर्यंत फोल ठरली आहे. यामुळे झालेल्या पेरण्या संकटात सापडल्या आहेत.

जून संपला, पाऊस फक्त १७ टक्के, पेरण्या संकटात
भारतातील नवीन लस Zydus Cadila , इंजेक्शनची गरज नसणार, मुलांसाठी चालणार का?

जून महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनपूर्व पावसाच्या दमदार हजेरी लावली होती. यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु जूनमध्ये जिल्ह्यात अवघा १६.९० टक्के पाऊस नोंदविला गेला. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी चिंताजनक आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण २६.५६ टक्के होते. जून महिन्यासंपल्यानंतर अद्याप ग्रामीण भागात पावसाची म्हणावी तशी हजेरी नाही. मान्सूनपूर्व पावसाच्या भरवश्यावर काही तालुक्यांमध्ये पेरणीचा श्रीगणेशा झाला होता. मात्र, मृगाचे नक्षत्र लागूनदेखील नंतरच्या टप्प्यात पावसाने दमदार हजेरी न लावल्याने आता पेरण्या संकटात सापडल्या आहेत.

यंदा पावसाने महिनाभर अंदाज चुकविल्याने जिल्ह्यात पेरण्यांसमोरही संकट उभे ठाकले होते. दरम्यान, जूनच्या अखेरीस पावसाने हजेरी लावत पेरणी झालेल्या पिकांना जीवदान दिले आहे. तरीही किमान ८० मिमी पाऊस झाल्यानंतरच जमिनीची ओल विचारात घेऊनच पेरण्या करण्याचे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे. जूनअखेरपर्यंत जिल्ह्यात २५०५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा या आदिवासी तालुक्यांसह निफाड, मालेगाव या भागात पावसाने अपेक्षित प्रमाणात हजेरी लावली. नाशिकसह दिंडोरी, कळवण, चांदवड, नांदगाव, देवळा, येवला या तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण अल्प आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या महिन्यात सुमारे ९२.६२ टक्के पाऊस होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात अवघ्या १६.७० टक्के पावसाची नोंद झाली आहे.

तालुका ............................. जून २०२१ मधील पाऊस (मिमी)............... तालुकानिहाय पाऊस (टक्केवारीत)

नाशिक ......................................... ७२.० .................१०.३५

इगतपुरी ........................................ ६८२.० .....................२२.३५

दिंडोरी ............................................७२.० ..............१०.६०

पेठ ............................................ ३४४ ....................१६.८८

त्र्यंबकेश्वर ................................... २५०.० ............................११.५४

मालेगांव ..................................... १३९.० .................३०.३८

नांदगांव ...................................... ४७.०..................................९.५७

चांदवड ...................................... ७३.० ..............................१३.७९

कळवण ......................................६२.०..........................................९.८५

बागलाण ..................................... ११३.० ................................२३.१५

सुरगाणा ..................................... ३६९.६ ............................१९.०२

देवळा ....................................... ४६.९ .................................११.१०

निफाड .................................... १४९.८ .................................३२.४०

सिन्नर ...................................... ७३.० ...........................................१३.९७

येवला ................................. ४२.०..............................................९.२६

एकूण .......................................२५३६.१ मिमी ..............................१६.९०%

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com