Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशMonsoon 2021 - बळीराजासाठी आनंदाची बातमी; यंदा मान्सून वेळेवर दाखल होणार!

Monsoon 2021 – बळीराजासाठी आनंदाची बातमी; यंदा मान्सून वेळेवर दाखल होणार!

दिल्ली l Delhi

भारतामध्ये करोनाच्या दुसर्‍या लाटेचा कहर अजूनही सुरू आहेच. त्यातच देशातील बळीराजासह नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यंदा केरळात मान्सून वेळेवर दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक आहे.

- Advertisement -

यंदा १ जून रोजी मान्सूनचे केरळमध्ये आगमन होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. यंदा सरासरीच्या ९८ टक्के अर्थात समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

यासंदर्भातलं परिपत्रक हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलं असून त्यामध्ये याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पॅसिफिक महासागर आणि हिंद महासागर यामध्ये होणाऱ्या अनुकूल बदलांमुळे भारतात मान्सून समाधानकारक राहणार असल्याचा हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे.

तसेच १० जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल तर १५ ते २० जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापण्याचा अंदाज आहे, अशी शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.

मागील २ वर्षात अरबी समुद्रातील वादळामुळं महाराष्ट्रात मान्सून लांबला होता. मात्र, सध्या अशी कोणतीही चिन्ह दिसत नसल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्यामुळं केरळात जर मान्सून वेळेवर दाखल झाला तर महाराष्ट्रातही वेळेवर दाखल होण्याचा अंदाज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या