
मुंबई | Mumbai
देशभरात उष्णतेने हैराण होत असताना सर्व जण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच हवामान खात्याने मान्सूनच्या संदर्भात दिलासादायक बातमी दिली आहे.
मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला आहे. याबाबतची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. मान्सून काही काळ श्रीलंकेच्या वेशीवर अडकला होता मात्र, अखेर तो आज केरळमध्ये दाखल झाले आहे. दरम्यान, पुढच्या सात दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.