Monday, April 29, 2024
Homeमहाराष्ट्रकरोनानंतर आता मंकीपॉक्सची भीती! महाराष्ट्र सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जारी

करोनानंतर आता मंकीपॉक्सची भीती! महाराष्ट्र सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जारी

मुंबई । Mumbai

करोनाच्या (COVID19) मगरमिठीतून जग आता कुठे मोकळा श्वास घेत असतानाच मंकीपॉक्स (Monkeypox virus) नावाच्या विचित्र आजाराने डोके वर काढले आहे. सध्या या विचित्र आजाराने त्रस्त असलले रुग्ण युरोप, कॅनडा, ऑस्ट्रेलिया इत्यादी ठिकाणी सापडले आहेत.

- Advertisement -

सध्या भारतात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, मात्र इतर देशांतील प्रकरणे पाहता केंद्रीय आरोग्य विभागाने सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. या सूचनेनंतर महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने मंकीपॉक्सबाबत मार्गदर्शक तत्वे (Advisory) जारी केली आहे.

काय आहेत आरोग्य विभागाची मार्गदर्शक तत्वे? (Monkeypox virus health advisory issued by Maharashtra)

मंकीपॉक्सचा प्रसार झालेल्या देशांमध्ये गेल्या २१ दिवसांत प्रवास करणाऱ्या सर्व संशयित रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवणे. तसेच संशयित रुग्णांची माहिती स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीने आरोग्य विभागाला देण्याच्या सूचना.

एखाद्या नागरिकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू केले जाईल.

रक्त, थुंकी आणि संशयित रुग्णांचे नमुने एनआयव्ही (NIV) पुणे येथे तपासणीसाठी पाठवले जातील.

गेल्या २१ दिवसात रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांना ताबडतोब ओळखावे लागेल आणि त्यांना क्वारंटाईन करावे लागेल.

जोपर्यंत संशयित रुग्णांच्या सर्व जखमा बऱ्या होत नाहीत आणि त्वचेचा एक नवीन थर तयार होत नाही, तोपर्यंत क्वारंटाईन संपवता येणार नाही.

मंकीपॉक्स काय आहे?

मंकीपॉक्स विषाणूच्या संसर्गामुळे होणारा आजार आहे. हे ऑर्थोपॉक्स व्हायरस वंशाचे आहे, ज्यामध्ये व्हेरिओला व्हायरस, वॅक्सिनीसा व्हायरस आणि काउपॉक्स यांचा समावेश होतो. मंकीपॉक्स हा एक जुनोसिस आहे, ज्याचा अर्थ असा आहे की हा संसर्ग झालेल्या प्राण्यापासून मानवांमध्ये पसरणारा रोग आहे. तज्ज्ञांच्या मते मंकीपॉक्सचा शोध प्रथम १९५८ मध्ये लागला होता.

काय आहे मंकीपॉक्सची लक्षणे?

मंकीपॉक्सची लागण झाल्यापासून पाच दिवसांत ताप, तीव्र डोकेदुखी, सूज, पाठदुखी, स्नायू दुखणे आणि थकवा यासारखी लक्षणे दिसून येतात.

मंकीपॉक्स सुरुवातीला चिकनपॉक्स, गोवर किंवा चेचक यांसारखा दिसतो.

ताप आल्यानंतर एक ते तीन दिवसांनी त्याचा परिणाम त्वचेवर दिसू लागतो.

शरीरावर पिंपल्स दिसतात.

हात, पाय, तळवे, पायाचे तळवे आणि चेहऱ्यावर लहान मुरुम दिसण्यास सुरुवात होते.

हे मुख्यतः चेहरा आणि हाताचे तळवे आणि पायांच्या तळवे यांना प्रभावित करते.

- Advertisment -

ताज्या बातम्या