अनिल देशमुखांच्या घरी सीबीआयचे पथक, मुलास घेतले ताब्यात

अनिल देशमुखांच्या घरी सीबीआयचे पथक, मुलास घेतले ताब्यात
अनिल देशमुख

मनी लाँड्रिंग (money laundering) प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या निवासस्थानी आज सीबीआयने(CBI) छापेमारी केली, त्यावेळी सीबीआयचे ७ अधिकारी देशमुखांच्या घरी पोहचले. देशमुख यांचा मुलगा आणि सुनेला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून अटक होण्याची शक्यता आहे.

अनिल देशमुख
आर्यनचा कोठडीतील मुक्काम वाढला : वाचा, आज काय झाले कोर्टात

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)यांच्या नागपुरातील सिव्हिल लाईन्स स्थित निवासस्थानी सीबीआयची कारवाई सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या हातात एक लिफाफा होता. या लिफाफ्यात काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

100 कोटींच्या वसुलीचे जे आरोप अनिल देशमुख यांच्यावर झाले आहेत त्या प्रकरणी त्यांच्यावर ईडी आणि सीबीआय यांच्याकडून चौकशी केली आहे. जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ईडीने विविध ठिकाणी छापेमारी केली. त्यानंतर त्यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे यांनाही अटक केली. तसंच कुंदन शिंदे यांनाही अटक केली.

आयकर विभागाचा छापा

गेल्या महिन्यात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या घरासह इतर मालमत्तांवर धाड (Income Tax raid) टाकली होती. नागपुरातील मिडास बिल्डिंगमधील साई शिक्षण संस्थेच्या कार्यालयाची झाडाझडती केली. या कारवाई दरम्यान इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत CRPF चे पथक सुद्धा उपस्थित होतं.

Related Stories

No stories found.